यावल, जि.जळगाव : गेल्या महिन्यात येथील बाबा नगरातील ३५ वर्षीय इसमाने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून एक महिन्यापासून फरार असलेला संशयित आरोपी शेख जुबेर शेख लालू यास रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने अटक केली आहे.येथील बाबानगरातील संशयित आरोपी शेख जुबेर शेख लालू याने घरालगतच्या १२ वर्षीय मुलासह तिच्या लहान भावास मोटारसायकलवरून फिरवून आणण्याच्या बहाण्याने नेवून निर्जनस्थळी मुलीचा मोटारसायकलवर विनयभंग केला होता.घटनेनंतर मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख जुबेर शेख लालू याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३५४, बाललैंगिक लैंगीक गुन्हा सरंक्षण कायदा २०१२ चे कलम (१) ३, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. रविवारी येथील पो. नि. दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर, पो.कॉ.संजय तायडे, विक्की ठाकूर, राजेश महाजन यांनी आरोपीस शहरात अटक केली.
यावलमधील विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:40 IST
गेल्या महिन्यात येथील बाबा नगरातील ३५ वर्षीय इसमाने १२ वर्षीय मुलीचा विनयभंग करून एक महिन्यापासून फरार असलेला संशयित आरोपी शेख जुबेर शेख लालू यास रविवारी सायंकाळी पोलीस पथकाने अटक केली आहे.
यावलमधील विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक
ठळक मुद्देमहिनाभरानंतर आरोपीस जेरबंद करण्यात यशफिरवून आणण्याच्या बहाण्याने नेले होते निर्जनस्थळीमोटारसायकलवर केला होता विनयभंग