दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:12 IST2021-06-30T04:12:09+5:302021-06-30T04:12:09+5:30

आरोपी शंकर रवींद्र चौधरी (२४, शिव कॉलनी चाळीसगाव) हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत ...

Accused absconding from hospital caught by Chalisgaon police | दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

दवाखान्यातून फरार असलेला आरोपी चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी शंकर रवींद्र चौधरी (२४, शिव कॉलनी चाळीसगाव) हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असताना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. २६ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या चौथ्या माळ्यावरून जाळी तोडून फरार झाला होता, तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डीबीचे पो. कॉ. भूषण पाटील, सतीश राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि. २९ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंटजवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे.

या घटनेत सहायक पोलिस निरीक्षक अनिल अहिरे, पो. कॉ. शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहकार्य केले.

Web Title: Accused absconding from hospital caught by Chalisgaon police