शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असणाऱ्या गुलाबराव देवकरांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:38 IST

अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

NCP Gulabrao Devkar ( Marathi News ) : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य प्रवेशाला अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रविवारी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत देवकरांच्या प्रवेशाला विरोध असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. बैठकीला अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जळगाव तालुकाध्यक्ष भूषण पवार, नाटेश्वर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांना ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले की, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी च्या अधिकृत उमेदवार असलेल्या पुष्पा महाजन यांच्या विरोधात देवकर यांनी काम केले होते. यासह जर अजित पवार गटात प्रवेश करायचाच होता, तर मग विधानसभेच्या निवडणुकीआधीच्च करायला हवा, आता अजित पवार गट सत्तेत आल्यामुळे प्रवेश करण्याचा देवकरांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रवेश बंद असल्याचे लावले बॅनर... 

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पक्ष व पक्ष कार्यालयात देवकर यांना प्रवेश बंद असे बॅनर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आले आहे. ज्या वेळेस पक्षात दोन गट निर्माण झाले, त्यावेळेस अजित पवार यांचा संघर्षाचा काळ होता त्यावेळेस देवकरांनी साथ दिली नाही. आता सत्ता आल्यामुळे देवकर पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाला सर्व तालुका कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रवेशाला आम्ही विरोध करु अशी भूमिका पक्षाचे तालुकाध्यक्ष भूषण पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार