शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जिल्ह्यासाठी नवीन ८० व्हेंटिलेटर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:34 IST

कोरोनामुळे आरोग्य विभागाचा कायापालट : आणखी पाच व्हेंटीलर आज येणार

जळगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ ५७ व्हेंटिलेटरवर अवलंबून असलेल्या जिह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी आता एकाच वेळी तब्बल ८० व्हेंटिलेटर दाखल झाले आहेत. कोरोनाच्या संकटात या पूर्वी कोविड रुग्णालयात ७४ व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असून आता यात आणखी ८० व्हेंटिलेटरची भर पडली आहे. हे ८० व्हेंटिलेटर पीएम केअर योजनेतून ग्रामीण यंत्रणेसाठी प्राप्त झाले आहेत. या सोबतच तीन उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचा अतिदक्षता विभाग सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी दिली.

वर्षानुवर्षे सुधारणेच्या प्रतीक्षेत असलेल्या आरोग्य यंत्रणेचा कोविडच्या काळात कायापालट होत असल्याचे गेल्या दोन महिन्यांपासूनचे चित्र आहे़ जिल्हा रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून सहा व्हेंटीलेटर्स व एकच अतिदक्षता विभाग होता़ मात्र, आता या ठिकाणी ७४ व्हेंटिलेटर्स व चार अतिदक्षता विभाग सुरू झाले आहेत़ सर्व कक्ष अगदी चकाचक झाले असून रुग्णालयाला कॉर्पोरेट लूक आला आहे़ मनुष्यबळाचा मुद्दा मात्र, ऐरणीवर आहे़ ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही सुधारणा होत असून जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर या तीनही उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी २ बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे़अ‍ॅन्टीजन किट येणारजिल्हाभरात अ‍ँंटीजन किटचा तुटवडा असून नुकत्याच तीन हजार किट प्राप्त झाल्या आहे़ शिवाय खासगी स्तरावरही आयसीएमआरच्या निर्देशानुसान एका खासगी कंपनीकडून ८ हजार किटची मागणी नोंदविण्यात आली आहे़ त्याही येत्या काही दिवसात उपलब्ध होणार आहेत़आतपर्यंत १५, ५०० किट उपलब्ध झाल्या असून त्या माध्यमातून तातडीने तपासण्या करण्यात आल्या. सद्यस्थितीत आणखी किट उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे डॉ़ चव्हाण यांनी सांगितले़लोकसहभागाचे मोठे उदाहरणजिल्ह्यात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर आॅक्सिजन पाईपलाईनची कामे होणे हे राज्यात पहिलेच उदाहरण असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व स्तरातून ५० लाख ते १ कोटीपर्यंतची रक्कम जमवून आरोग्य यंत्रणा सृदृढ करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे़ ग्रामीण भागात अनेक रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची वणवण थांबत असल्याचे सकारात्मक चित्र जिल्ह्यात आहे.एका रुग्णामागे वीस जणांची होणार तपासणीजळगाव : त्रिसदस्यीय केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांनुसार आता जिल्हाभरात चाचण्या वाढविण्यात येणार असून लो रिस्क कॉण्टकची तपासणी करण्यात येणार असून एका रुग्णामागे वीस तपासण्या असे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ अद्याप अनेक रुग्ण समोर येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे़ मध्यंतरीच्या काळात तपासण्यांची संख्या कमी झाली होती़ एका रुग्णांमागे किमान पंधरा जणांच्या तपासण्या करण्याचे नियोजन होते, मात्र त्यावर ठोस अंमलबजावणी झालेली नव्हती़ पाच ते सात व्यक्तिंच्याच तपासण्या होत होत्या़ मात्र, जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर लोकांमधून रुग्ण समोर येऊन त्यांचे निदान लवकर होणे अत्यावश्यक असल्याचे मत समितीनेही व्यक्त केले होते़ त्यानुसार जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणावर तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत़ त्यात अधिक वाढविण्यात येणार आहे़ तपासण्या वाढविल्याने रुग्ण समोर आले व पुढचा संसर्ग शिवाय रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण आपण कमी करू शकलो, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ चव्हाण यांनी सांगितले

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव