शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या ३०६५ जागांसाठी ५९३९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:13 IST

जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात २९६ पात्र ...

जळगाव : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात २९६ पात्र शाळेत ३ हजार ६५ जागांसाठी ५ हजार ९३९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

आरटीईतंर्गत इंग्रजी शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. यंदा २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे. ३ ते ३० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्‍याची मुदत देण्‍यात आली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून आरटीई प्रवेशासाठी ५ हजार ९३९ पालकांनी अर्ज केले आहेत. आता गोरगरिब मुलांना नोंदणीची मुदत संपल्यावर आता ६ एप्रिलला प्रवेशाची लॉटरी काढण्याचे निश्चित होत आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांनी ३ एप्रिलपर्यंत ''''डुप्लिकेट फॉर्म रिमूव्ह'''' करण्याचे काम पूर्ण करावे. ३ एप्रिलनंतर फॉर्म रिमूव्ह करता येणार नाहीत, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

आता लक्ष लॉटरीकडे

पालकांना अर्ज करण्‍याची मुदत संपली आहे. आता प्रतीक्षा आहे ती लॉटरीची. लवकरच ती सुध्दा जाहीर होणार आहे. नंतर लॉटरीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश निश्चित करून घ्यावयाचा आहे. त्याआधी पालकांनी दिलेले कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतरचं प्रवेश निश्चित होणार आहे.

============================================

तर मोठ्या शाळेचे स्वप्नही पाहू शकत नाही....

आरटीईच्या माध्‍यातून मुलांना चांगले शिक्षण मिळते. स्वप्नातही पाहू शकत नाही, अशा शाळांमध्‍ये पाल्यास प्रवेश मिळतो. ही प्रक्र‍िया दरवर्षी राबवावी. जेणे करून गोरगरिबांच्या मुलांना उत्तम व दर्जेदार शिक्षण मिळेल व कुटूंबाची स्थितीही सुधारेल.

- समाधान पाटील, पालक

दरवर्षी हजाराच्यावर आरटीईच्या जागा रिक्त राहतात. या जागा रिक्त राहणार नाही, यासाठी शिक्षण विभागाने पाउल उचलले पाहिजे. शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे. मोफत शिक्षण मिळत असल्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणण्यासाठी रिक्त जागांवर प्रवेश घेणे आवश्यक आहे.

- मुकेश मोरे, पालक

ज्या गावात राहत नाही. मात्र, प्रवेशा पुरता भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून अनेक पालक गोरगरिब विद्यार्थ्यांच्या जागांवर त्यांच्या पाल्यांचे प्रवेश मिळवितात. यामुळे दर्जेदार शिक्षणापासून गोरगरिब कुटूंबातील वंचित राहतो. त्यामुळे पालक प्रत्यक्ष कुठ राहतात, याचीही पडताळणी होणे अपेक्षित आहे.

- पांडुरंग गायकवाड, पालक

जळगाव जिल्ह्यातून ५ हजार ९३९ पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले आहे. लवकरच लॉटरी घोषित होणार आहे. लॉटरी निघालेल्या पालकांना संदेश पाठविला जाईल.

- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

==========================

आरटीईतंर्गत किती शाळांची नोंदणी - २९६

एकूण जागा - ३,०६५

एकूण प्राप्त अर्ज - ५९३९

=============================

तालुका शाळा जागा

अमळनेर १६ १६५

भडगाव २१ १५५

भुसावळ २१ २९१

बोदवड ८ ४१

चाळीसगाव २६ २१५

चोपडा १५ १६१

धरणगाव १५ १३४

एरंडोल २० ९९

जळगाव ग्रामीण २४ २५९

जळगाव शहर ३३ ५४१

जामनेर १२ १२०

मुक्ताईनगर ११ १२५

पाचोरा १८ २६५

पारोळा १६ १३६

रावेर २२ १४०

यावल १८ ११८