शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर

By admin | Updated: July 2, 2017 17:52 IST

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय : एकही दुकानदार माल उचलणार नाही

ऑनलाईन लोकमतजळगाव,दि.2 - सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासनात समावेश करून घेण्याचा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. मात्र शासनाकडून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली  केली जात आहे. या मागणीकरीता राज्यातील 55 हजार स्वस्त धान्य दुकानदार 1 ऑगस्टपासून संपावर जाणार असल्याचा निर्णय स्वस्त धान्य दुकानदारांनी घेतला रविवारी घेतला. रविवारी जळगाव शहरातील पत्रकार भवनात ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स व राज्य रेशन संघटनेच्या पदाधिका:याची राज्यस्तरीय बैठक झाली.  यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर, बाबुराव म्हमाणे , जमनादास भाटीया, विजय गुप्ता, गणपत डोळसे-पाटील, ए.के.खान, संजय देशमुख, जगन्नाथ धोटे, अण्णाजी शेटे, देवीदास देसाई, शहाजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.  यांच्यासह राज्यभरातून आलेले संघटनेचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.  पैशांसाठी नाही, जगण्यासाठी लढा पुकारायावेळी बोलताना गजानन बाबर म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांकडून जो  संप पुकारण्यात येत आहे. तो संप हा कुठल्याही सरकार विरोधात नसून, तो दुकानदारांच्या हक्कासाठीचा लढा आहे. आता पैशांसाठी नाही तर जगण्यासाठी लढा पुकारा असे आवाहन बाबर यांनी केले. 1 ऑगस्टपासून राज्यभरातील दुकानदार संप करणार असून संप काळात एक ही दुकानदार माल उचलणार नाही असा ठराव राज्यस्तरीय बैठकीत अध्यक्ष गजानन बाबर यांनी जाहीर केला. हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. सामूहिक आत्मदहनाचा इशारासंघटनेचे उपाध्यक्ष जमनादास भाटीया यांनी सांगितले की, संपाच्या काळात सर्व  दुकानदारांनी एकोपा दाखविण्याची गरज आहे.  जोर्पयत मागणी पूर्ण होणार नाहीत. तोर्पयत संप कायम ठेवण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला. मागणी पूर्ण न झाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील भाटीया यांनी दिला.