शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर 'टोल'वर ५0 टक्के सवलत

By admin | Updated: November 19, 2014 13:52 IST

शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

धुळे : शिरपूर मार्गावर असलेल्या टोल नाक्यावर एसटी बसेसला ५0 टक्के सवलत मिळविण्यात विभाग नियंत्रकांना यश आले आहे. राज्यस्तरावर हा लाभ मिळावा म्हणून वरिष्ठ स्तरावरूनही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहा वर्षांपासून महामंडळ तोट्यात आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. यात टोल नाक्यांवरही एसटी बसला सवलत मिळावी म्हणून राज्यपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर विभाग नियंत्रकांनी जिल्ह्यातील धुळे - शिरपूर टोल नाका प्राधिकरणाशी चर्चा केली आणि त्यात एका बसला ५0 टक्के सवलत मिळवून घेण्यात यश मिळविले आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक बसेस रोज धुळे-शिरपूर महामार्गावर धावतात. त्यामुळे या महामार्गावर असलेल्या दोन टोल नाक्यांवर बससाठी मोठय़ा प्रमाणात टोल भरावा लागत होता. त्यात सवलतीसाठी प्रयत्न सुरू होते. शिरपूर शहरानजीक असलेल्या आढे येथील टोल नाका प्राधिकरणाने चर्चेअंती बसला ५0 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे महामंडळाला रोज १६ हजार रुपयांच्या बचतीचा फायदा होत आहे. धुळे - शिरपूर महामार्गावरून रोज १४0 बसेसच्या फेर्‍या होतात. भविष्यात राज्यातील सर्वच टोल नाक्यांवर बसेसला टोलमध्ये सवलत मिळवून देण्यासाठी टोल प्राधिकरण व एसटी परिवहन महामंडळात राज्यपातळीवर चर्चा सुरू आहे. विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांची अन्य सर्व टोल नाक्यांच्या मुख्य अधिकार्‍याशी चर्चा सुरू आहे.