शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते विक्रेत्यांसाठी 400 ‘इ पॉस’ यंत्र

By admin | Updated: June 15, 2017 12:16 IST

या यंत्रात शिल्लक खतसाठय़ाची माहिती समाविष्ट करता येत नसल्याने प्राप्त झालेले यंत्र कार्यरतही झालेले नसल्याची माहिती आहे

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 15 - जिल्हाभरातील रासायनिक खते विक्रेत्यांना खत विक्रीचे व्यवहार इ पॉस यंत्राद्वारे करण्याच्या सूचना दिल्या, पण अद्याप फक्त 400 यंत्र प्राप्त झाले आहेत. यातच या यंत्रात शिल्लक खतसाठय़ाची माहिती समाविष्ट करता येत नसल्याने प्राप्त झालेले यंत्र कार्यरतही झालेले नसल्याची माहिती आहे. जिल्हाभरात 1265 खत विक्रेते व वितरक आहेत. सर्व खतांची विक्री इ पॉस यंत्राच्या नियमनानुसार करायच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने मे महिन्यात दिल्या होत्या. 1 जूनपासून ही प्रणाली लागू करायची होती, परंतु अद्यापही ही प्रणाली लागू झालेली नाही. पूर्वीप्रमाणेच खतांची विक्री सुरू आहे. इ पॉस यंत्रात जे शेतकरी खत खरेदी करतील त्यांचा आधार क्रमांक व कुठल्याही बोटाचे ठसे घेतले जाणार आहेत. ही प्रणाली केंद्रीय खते मंत्रालयाशी निगडित असून, ऑनलाईन ही प्रक्रिया होईल. खते कुणाला व केव्हा व किती दिली याची नेमकी माहिती संकलानासाठी ही प्रणाली आहे. या प्रणालीसाठी आवश्यक इ पॉस यंत्र केंद्र शासन पुरस्कृत 12 खत उत्पादक कंपन्या खते वितरकांना उपलब्ध करून देत आहेत. अद्याप फक्त 400 यंत्र आले. ते बसविण्याचे काम जळगाव, अमळनेर, यावल, रावेर, जामनेरात सुरू आहे. आणखी 865 यंत्रांची आवश्यकता आहे. यातच या यंत्रात सध्या खत विक्रेत्याकडे शिल्लक खत साठय़ाची नोंद घेतली जात नसल्याची अडचण येत आहे. ही नोंद केल्याशिवाय खते विक्रेते पुढील व्यवसायही करू शकत नाहीत किंवा शिल्लक खते परत करणेही त्रासदायक आहे. हा सर्व गोंधळ सुरू असल्याने ही प्रणाली लागू होण्यास उशीर लागत असल्याची माहिती जि.प.च्या कृषी विभागातून मिळाली.