जिल्ह्यात ३५ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:48 IST2021-01-08T04:48:39+5:302021-01-08T04:48:39+5:30

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी ३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचारानंतर सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४१ आहे. ...

35 new affected in the district | जिल्ह्यात ३५ नवे बाधित

जिल्ह्यात ३५ नवे बाधित

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी ३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचारानंतर सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४१ आहे. आता जिल्ह्यात एकूण ५६ हजार १२४ रुग्ण आहेत. त्यातील ४७४ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहे, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८२ वर्षांचा पुरुष आणि भुसावळ तालुक्यातील ७२ वर्षांची महिला यांचा समावेश आहे.

कोरोना चाचण्यांची संख्या घटली

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना चाचण्याची संख्या घटली आहे. बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ५३१ जणांचे नमुने पाठ‌वण्यात आले. तर ४१० अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. अँटिजेन चाचण्यांमधून १७ नवे बाधित आढळले आहेत, तर आरटीपीसीआरचे २८८ अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 35 new affected in the district