शिवारातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार; जळगावमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 17:38 IST2022-05-16T16:55:19+5:302022-05-16T17:38:32+5:30
भडगाव : तालुक्यातील एका गावाच्या शिवारातील शेतातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ...

शिवारातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार; जळगावमधील धक्कादायक घटना
भडगाव : तालुक्यातील एका गावाच्या शिवारातील शेतातील विहिरीजवळ २७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात निरू भीमसिंग ऊर्फ जाड्या बारेला (वय २५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१२ मे २०२२ रोजी पीडित विवाहित महिला ही पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. यावेळी निरू भीमसिंग ऊर्फ जड्या बारेला हादेखील विहिरीवर पाणी भरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पीडितेवर बलात्कार केला. पीडिता आरोळ्या मारत असताना आरोपीने चापटांनी मारून ओरडू नको, नाहीतर तुझा गळा कापून टाकीन, असा दम विवाहितेला दिला.
याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात निरू भीमसिंग ऊर्फ जाड्या बारेला (हल्ली रा. भडगाव, मूळ गाव झामटा, धवली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, म.प्र.) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली स.पो.नि. चंद्रसेन पालकर करीत आहेत.