शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

25 कोटींचा प्रस्ताव वादात

By admin | Updated: March 7, 2017 00:40 IST

आमदारांची नगरविकास सचिवांकडे तक्रार : प्रस्तावात बदल करण्याचा प्रय}

जळगाव : गेल्या दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी शहर विकासासाठी मनपाला जाहीर केलेल्या 25 कोटींच्या निधीचा प्रस्ताव अद्यापही वादातच अडकला आहे. आता दुस:यांदा मनपाने ठराव करून शासनाकडे पाठवलेला प्रस्ताव बदल करण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन पूर्वी झालेल्या रस्त्यांचाच यात समावेश झाल्याची तक्रार केली आहे.  खराब रस्त्यांचा या प्रस्तावात समावेश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना शहरातील रस्त्यांचा सव्र्हे करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे हा प्रस्ताव बारगळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शहरातील विकासकामांमध्ये अडचणी येत असल्याचे निवेदन प्रथमच जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना भाजपा नगरसेवकांतर्फे देण्यात आले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मनपाने महासभेत हा प्रस्ताव मंजूर करून शासनाला पाठवला होता. मात्र, शासनाने अर्थसंकल्पात तरतूदच न केल्याने निधी मिळू शकला नव्हता. दरम्यानच्या काळात या प्रस्तावात समाविष्ट असलेले, परंतु अत्यंत दुरवस्था झालेल्या काही रस्त्यांची कामे सुमारे पावणेचार कोटींच्या निधीतून करण्यात आली होती. त्यानंतर महापौर नितीन लढ्ढा यांनी या 25 कोटींच्या निधीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. जामनेर दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर झाल्याचे पत्र तातडीने मनपाला पाठवले. त्यामुळे मनपाने जुन्या प्रस्तावातून पावणेचार कोटींची झालेली कामे वगळून त्यात नवीन कामांचा समावेश करून तो प्रस्ताव शासनाला पाठवला. शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव पडून आहे. दरम्यान, या प्रस्तावात सुचवलेली 11 कोटींची कामे कायम ठेवून उर्वरित निधीतून अत्यावश्यक रस्ते व गटारींची कामे करण्याचा प्रस्ताव देणार असल्याचे आमदार भोळे म्हणाले.आमदार म्हणतात, प्रस्ताव दाखवलाच नाही1 आमदार भोळे यांच्या म्हणण्यानुसार सर्वानुमते हा ठराव केला तर तो पाठवण्यापूर्वी त्यांना दाखवायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. तसेच या प्रस्तावात पूर्वी झालेल्या रस्त्यांची कामे समाविष्ट करू नये, असे सांगितले असतानाही पूर्वी काम झालेल्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला. कॉलनी एरियात रस्ते, गटारींची अत्यंत दुरवस्था झाली आहे.2 30 वर्षापासून काही भागात रस्ते, गटारींची कामे झालेली नाही. झालेल्या रस्त्यांचीच कामे पुन्हा करण्याऐवजी या रस्त्यांची कामे समाविष्ट करण्याची गरज होती. आम्हाला प्रस्ताव दाखवला असता तर काही बदल सुचवले असते व विरोधाची भूमिका घेण्याची वेळच आली नसती.3 त्यासाठी महापौरांशी फोनवरून बोललोही होतो. मात्र, न दाखवताच प्रस्ताव पाठवल्याने नगरविकास विभागाच्या सचिवांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रस्तावात बदल करण्यासाठी प्रय}शील असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सव्र्हे करून कामांचा समावेश करण्याची सूचना केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले आहे.