शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुदत ठेवीच्या पावत्या बेकायदेशीर वर्ग करुन १६ कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 19:55 IST

सूरज झंवरला ११ दिवस कोठडी : पुणे, नशिराबादच्या मालमत्ता खरेदीत अपहार

जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज झंवर याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग अण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. सूरज याला शनिवारी पुणे न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.बीएचआरचे कोहीनूर आर्केड बल्क लॅन्ड क्र.२ निगडी, ता.हवेली येथील दुकान क्र,१६,१७,१८ व १८ ए या सात कोटी रुपयांच्या मालमत्तेचा अपहार करुन ही मालमत्ता २ कोठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचा खरेदी केल्याचे भासविले, याच प्रकारे बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ८ कोटीपेक्षा जास्त किमतीची केवळ ३ कोटी ११ लाख ३३ हजार १११ रुपयांना खरेदी केल्याचे भासविले. यातही अशाच प्रकारे पावत्या वर्ग करण्यात आल्या. नशिराबाद येथील दुकान क्र.१,२ व ३ हे देखील १९ लाख ५१ हजार ५१५ रुपयांना खरेदी केल्याचे भासवून अपहार केल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.दरम्यान, सूरज हा साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि.या कंपनीचा संचालक आहे. विविध प्रकारचे टेंडर स्वत:च्या लॅपटॉपवरुन भरायचा. श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी व श्री साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग प्रा.लि. या दोघांचा पत्ता ४२, खान्देश मील शॉपींग कॉम्लेक्स, जळगाव हा एकच असून सूरज हा एका कंपनीत भागीदार होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव