11 पोलीस कर्मचा:यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By Admin | Updated: April 27, 2017 00:08 IST2017-04-27T00:08:13+5:302017-04-27T00:08:13+5:30

उत्कृष्ट कामगिरी : ‘एसआरपीएफ’सह प्रशिक्षण केंद्रातील कर्मचा:यांचाही समावेश

11 Police personnel: Honor holders of the General Secretaries | 11 पोलीस कर्मचा:यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

11 पोलीस कर्मचा:यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

धुळे : राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचा:यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आह़े त्यात जिल्ह्यातील पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 च्या 11  अधिकारी, कर्मचा:यांचा समावेश आह़े
1 मे रोजी महाराष्ट्रदिनी पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात येणा:या संचलनावेळी समारंभपूर्वक त्याचे  वितरण करण्यात येणार आह़े 
 जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक जितेंद्र नारायण सोनार,  ईश्वरलाल कृष्णाजी सूर्यवंशी, चालक पोलीस हवालदार राजू आत्माराम पाटील,  प्रेमसिंग नवलसिंग सिसोदे, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गुलाबराव मराठे, पोलीस हवालदार रमेश काशिनाथ बारसे व एसआरपीएफचे सशस्त्र पोलीस निरीक्षक संजय उत्तम साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर प्रभाकर बाविस्कर, दिलीप पुंडलिक पाटील, पांडुरंग सावळू थोरात यांना सेवेत सतत 15 वर्ष उत्तम सेवाभिलेखाबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आह़े
रशीद तडवी यांना पोलीस पदक
पोलीस शौर्य पदक व उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्राप्त येथील एसआरपीएफचे सहायक समादेशक रशीद तडवी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे पोलीस पदक जाहीर झाले आह़े त्यानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचा:यांचे अभिनंदन होत आह़े

Web Title: 11 Police personnel: Honor holders of the General Secretaries