शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

२२ दिवसांत वाढला २८ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:32 AM

जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ...

जालना : चालू महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. गत आठवड्यापासून सातत्याने अतिवृष्टी होत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ पैकी ४६ प्रकल्प तुडुंब भरले आहेत. विशेषत: मागील २२ दिवसांमध्येच या प्रकल्पांमध्ये तब्बल २८ टक्के पाणीसाठा वाढला आहे.

यंदा प्रारंभीपासूनच पावसाने जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३.१० मिमी आहे. परंतु, आजवर जिल्ह्यात तब्बल ९७७.३० मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या १६२.५० टक्के पाऊस झाला आहे. विशेषत: चालू महिन्यात तब्बल दमदार पाऊस होत आहे. सातत्याने अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांसह फळबागांना अधिकचा फटका बसला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ५८.८६ टक्के पाणीसाठा होता. परंतु, नंतरच्या कालावधीत पडलेल्या पावसामुळे यात २८ टक्क्यांनी वाढ होत हा पाणीसाठा ८७.३४ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील ६४ पैकी तब्बल ४६ प्रकल्प तुडुंब झाले आहेत. तीन प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा झाला आहे. चार प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ प्रकल्पांच्या क्षेत्रात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या आठही प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्क्यांच्या मध्येच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. इतर प्रकल्पांमध्ये मात्र पाण्याची आवक समाधानकारक आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा करणारे बहुतांश प्रकल्प समाधानकारकरीत्या भरले आहेत. त्यामुळे या भागांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. शिवाय रब्बी हंगामात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

प्रकल्प उपयुक्त पाणी

कल्याण गिरजा प्रकल्प जालना १०० टक्के

कल्याण मध्यम प्रकल्प जालना ९२.९६ टक्के

अप्पर दुधना प्रकल्प बदनापूर ७५.४५ टक्के

जुई मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के

धामना मध्यम प्रकल्प भोकरदन १०० टक्के

जीवरेखा मध्यम प्रकल्प जाफराबाद ४३.२३ टक्के

गल्हाटी मध्यम प्रकल्प अंबड १०० टक्के