शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वडीगोद्री ते दुनगाव रस्त्याची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री- रामगव्हाण- टाका- दुनगाव या रस्त्यावर मोठ- मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी ...

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री- रामगव्हाण- टाका- दुनगाव या रस्त्यावर मोठ- मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

तालुक्यातील वडीगोद्री- रामगव्हाण- टाका- दुनगाव या रस्त्यावर अनेक गावे आहेत. अंतर कमी असल्याने बहुतांश जण या रस्त्याने ये- जा करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, अलीकडे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली आहेत. काटेरी झुडपांचा फटकारा बसून गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरील खडी उखडून गेली आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत असून, याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वडीगोद्री ते दुनगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. काटेरी झुडपे ये- जा करणाऱ्या वाहनांना लागत आहेत. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

-समीर शेख, ग्रामस्थ, रामगव्हाण

वडीगोद्री- रामगव्हाण- टाका- दुनगाव या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याचे तातडीने काम करावे.

-अंबादास गायकवाड, ग्रामस्थ, टाका