जालना : लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.लोकमत सखी मंच सदस्य नोंदणीचे काही दिवस शिल्लक असून, महिलांना वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या मंचच्या माध्यमातून दिली जात आहे. यापूर्वी लावणीसह पर्यावरणपूरक होलिकोत्सव, पाकशास्त्र, सांस्कृतिक, नाट्य आदी कार्यक्रम घेण्यात आले.मंगळवारी ‘ऐका दाजिबा’ या गाण्याद्वारे घराघरात पोहोचलेल्या प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांचा म्युझिकल कॉन्सर्टचे भारती लॉन्सवर आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच सदस्य नोंदणी करता येणार आहे.नोंदणी करताच ७७५ रुपयांचा अंजली किचन कॉम्बोसह ४ हजार रुपयांचे हमखास भेटवस्तू कूपन मिळणार आहे.तसेच १ लाखाचा लकी ड्रॉ व सर्व सखींना लोकमत सखी मंचची नोंदणी करुन वर्षभर होणा-या विविध कार्यक्रमांचा आनंद लुटावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९४२३०१९४४६ वर संपर्क साधावा.
वैशाली सामंत आज सखींच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:52 IST