लसीकरण मोहिमेस जाफराबादेत सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:54+5:302021-02-10T04:30:54+5:30

जाफराबाद : ग्रामीण रुग्णालय, जाफराबाद व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, शिक्षण विभाग व शासकीय कार्यालयात ...

Vaccination campaigns begin in Jafarabad | लसीकरण मोहिमेस जाफराबादेत सुरुवात

लसीकरण मोहिमेस जाफराबादेत सुरुवात

जाफराबाद : ग्रामीण रुग्णालय, जाफराबाद व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, शिक्षण विभाग व शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कोरोना लस दिली जात आहे. येथील समर्थ विद्यालयात कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरण सत्रास सोमवारी तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी सर्वांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले.

आतापर्यंत तालुक्यातील ५९१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात आरोग्य, नगरपरिषद, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पोलीस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना लस देण्यात आली. तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार विवेक हरिदास पाटील यांनी कोरोनाची लस घेतली आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एम. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग सोनटक्के, पंचफुला खरात, सपना पठाडे, शेख शबाना, प्रशांत गुलगुले, शंकर लहाने, कुलदीप सेवलीकर, सागर दांडगे, वंदना हिवाळे, सुनंदा खरात, प्रवीण रोटे, रवि जावळे, निलेश शेळके, गणेश मुनिमाणे, सतीश गुळवे, अनिल चुंगडा यांच्यासह मुख्याध्यापक संजय गौतम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Vaccination campaigns begin in Jafarabad