वाहनाच्या धडकेत दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:27 IST2019-03-24T00:27:15+5:302019-03-24T00:27:28+5:30
भरधाव बसने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने सागर विठ्ठल पैठणे हे ठार झाले

वाहनाच्या धडकेत दोन जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भरधाव बसने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने सागर विठ्ठल पैठणे हे ठार झाले , तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात गुरूवारी रात्री आठ वाजता दहीगाव -टेंभूर्णी मार्गावर घडला.
या प्रकरणी विठ्ठल यमाजी पैठणे यांच्या फिर्यादीवरुन शनिवारी बस क्रमांक एम. एच. २० बी.एल ०८४८ चालकाविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
बदनापूर - तालुक्यातील पाडळी येथील गणेश रामराव सिरसाठ यांना दि. २१ मार्च रोजी सायंकाळी जालना औरंगाबाद महामार्गावर हॉटेल एकांतसमोर एका वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी केले़
उपचारा दरम्यान २२ मार्चला औरंगाबादेत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.