शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात इनपूट क्रेडिट टॅक्सप्रकरणी दोन उद्योजकांना अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST

गेल्या महिन्याभरापासून स्टेट जीएसटी आणि सीजीएसटी या दोन्ही विभागांने जालन्यातील व्यापारी तसेच उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. एकूणच जीएसटी ...

गेल्या महिन्याभरापासून स्टेट जीएसटी आणि सीजीएसटी या दोन्ही विभागांने जालन्यातील व्यापारी तसेच उद्योजकांच्या मागे ससेमिरा लावला आहे. एकूणच जीएसटी कायदा लागू झाल्यात त्यात साडेतीन वर्षांत तब्बल ९३७ दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे कुठले नियम आणि निकष पाळावेत याचा मोठा संभ्रम व्यापारी, उद्योजकांना निर्माण झाला आहे.

तीन दिवसांपूर्वी सीजएसटीच्या पथकाने जालन्यातील एका स्टील उद्योजकाच्या काराखान्यासह घराची झाडाझडती घेतली होती. त्यात त्यांना काही खरेदी-विक्रीची आक्षेपार्ह देयके आढळून आली. यात ज्यांच्याकडून कच्चा माल घेतला आहे, त्या कंपनीकडे संबंधित उद्योजकांनी जीएसटी अदा करून बिल दिल आहे. असे असतांना जीएसअीचा परतावा मिळावा म्हणून ज्यावेळी सीजीएसटीकडे क्लेम केला हाेता, तो क्लेमच चुकीचा असल्याचे सांगून एकूणच संबंधित उद्योजकांवर संशय घेतला आहे. यावरून त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चुकीचा क्लेम केल्याचा ठपका ठेवला

संबंधित स्टील उद्योजकाने इनपूट टॅक्स क्रेडिटसाठी जीएसटी विभागाकडे क्लेम केला होता. परंतु हा क्लेम चुकीचा असल्याचे सांगून तुम्ही ज्या व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी केली आहे, तो जीएसटीच्या यादीतून बाद झाला आहे. त्यामुळे तुम्हाला हा परतावा मिळूच शकत नाही. असे जीएसटीने म्हटले आहे. एकूणच लाखो रुपयांच्या या परताव्याचा भुर्दंड आता व्यापारी, उद्योजकांना सहन करावा लागणार आहे.

सीजीएसटीकडून खुलासा नसल्याने संभ्रम

सीजएसटी तसेच जीएसटीकडून अनेक व्यापारी, उद्योजकांवर कारवाई केली जात आहे. तसेच काही ठिकाणी सर्वेक्षण केले जाते. परंतु ही कारवाई झाल्यावर त्याची चर्चा वाऱ्यासारखी शहर आणि उद्योग, व्यापारी जगतात होते. परंतु नेमकी कोणावर कारवाई झाली हे समोर येत नसल्याने अनेक नियमपणे कर भरून नियम पाळणारे उद्योजक, व्यापाऱ्यांबंदलही शंका निर्माण होते. त्यामुळे जीसएसटी अथवा सीजीएटीने पोलिसांप्रमाणे प्रेसनोट काढून संशयितांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.