अवैधरीत्या दारूची विक्री करणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST2021-07-17T04:24:18+5:302021-07-17T04:24:18+5:30

अपघातात एक ठार जालना : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार झाल्याची घटना जाफराबाद-टेंभुर्णी मार्गावरील पिराजवळ १५ जुलै ...

Two arrested for selling liquor illegally | अवैधरीत्या दारूची विक्री करणारे दोघे अटकेत

अवैधरीत्या दारूची विक्री करणारे दोघे अटकेत

अपघातात एक ठार

जालना : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार झाल्याची घटना जाफराबाद-टेंभुर्णी मार्गावरील पिराजवळ १५ जुलै रोजी घडली. शेषराव विश्वनाथ मघाडे (रा. काळेगाव) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रंजना शेषराव मघाडे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. गवळी करीत आहेत.

३७ हजार रुपयांचे साहित्य चोरी

जालना : जुना जालना भागातील रेणुका अपार्टमेंटमधील स्टोअररूमचा कडीकोयंडा तोडून ३७ हजार ६२० रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना १२ जुलै रोजी घडली. या प्रकरणी किरण कोळेश्वर यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Two arrested for selling liquor illegally