भोकरदनमध्ये भरदिवसा तीन चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:50 IST2018-11-25T00:50:13+5:302018-11-25T00:50:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : येथील सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या पं. स. सदस्यांची अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपयांची ...

भोकरदनमध्ये भरदिवसा तीन चोऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या पं. स. सदस्यांची अज्ञात चोरट्याने ३० हजार रूपयांची पर्स लंपास केली. पर्स चोरणारी महिला सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. तसेच येथील बसस्थानकात एका महिलेची पोत व ज्योती घायवट यांचे ९५०० हजार रू. चोरट्यांनी लंपास केले आहेत.
शनिवारी येथील आठवडी बाजार होता. त्यामुळे इब्राहिमपूर पं.स. गणाच्या सदस्या कमलाबाई पगारे या मुलीला सोने खरेदी करून देण्यासाठी दुपारी शहरातील सर्वधन्य ज्वेलर्स मध्ये गेलत्या. त्या सोने बघत असतांना त्यांच्या हातात असलेल्या पिशवीला एका महिलेने ब्लेड मारून त्यातील पैशाची पर्स काढून दुस-या महिलेच्या हातात देऊन त्यांनी दुकानातून पळ काढला. त्यानंतर त्यांचा मुलगा यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील बसस्थानकामध्ये सुध्दा दुपारी बसमध्ये चढत असतांना एका महिलेचे १० हजार रू. असलेली पर्स चोरी गेली. दुस-या एका महिलेच्या गळ््यातील सोन्याची पोत चोरी गेली. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार दिलेली नाही.