शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 00:44 IST

दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन (जि. जालना) : दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले. भोकरदनमधील हसनाबाद-खादगाव पाटीजवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे.३१ डिसेंबर रोजी शेरखान मोहम्मदखान पठाण (५६) हे मुलगा जुबेरखान शेरखान पठाण (२८) याच्यासह दुचाकीने (एम.एच.२१,००८५) औरंगाबादहून हसनाबादकडे येत होते. तर योगेश कडुबा जाधव (२५), योगेश काकासाहेब मानकापे (२४) आणि रवि बन्सीधर मते (२०, सर्व रा. जातेगाव, ता. फुलब्री) हे दुचाकीवरून (एम.एच.२०, ईएक्स १६९८) फुलब्रीकडे जात होते. हसनाबाद ते तळेगाव मार्गावरील खादगाव पाटीजवळ दोन्ही दुचाकी भिडल्या. यात शेरखान मोहम्मदखान पठाण व त्यांचा मुलगा जुबेरखान शेरखान पठाण हे दोघे पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर दुसऱ्या दुचाकीवरील जखमी झालेल्या योगेश जाधव याचा औरंगाबादमध्ये रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे निरिक्षक किरण बिडवे, उपनिरिक्षक जी़एस़ पठाण, कर्मचारी उत्तम देशमुख, शेख जिलाल, सुभाष चव्हाण यांनी घटनास्थळी पोहचून जखमींना हसनाबाद येथील आरोग्य केद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी अरूण मुळे यांनी शेरखान मोहम्मदखान पठाण, जुबेरखान शेरखान पठाण यांना मृत घोषित केले. इतर तीन जखमींना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबादला हलविण्यात आले. यात योगेश जाधवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटीत उपचार सुरू आहेत. मृत पिता-पुत्रावर मंगळवारी हसनाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर मयत योगेश जाधव यांच्यावर जातेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू