Three lakh were looted by beating bank employees in Jalana | बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन लाख लुटले
बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करून तीन लाख लुटले

ठळक मुद्देपोलिसांनी नाकाबंदी केली असून तपास सुरु आहे

जालना : बुलढाणा अर्बन बँकेच्या जालना शाखेतील दोन कर्मचाऱ्यांना  मारहाण करून ३ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. नवीन मोंढा परिसरात ही घटना झाली असून दुचाकीवर जाणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अरविंद देशमुख व कागणे हे बुलढाणा अर्बन बँकेचे कर्मचारी सकाळी ३ लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते. ते कर्मचारी शहरातील नवीन मोंढा भागात आल्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्यांना काठीने मारहाण करून तीन लाखाची रोकड लंपास केली. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून, आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Three lakh were looted by beating bank employees in Jalana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.