शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:33 IST

मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी ही लूट केल्याची माहिती

ठळक मुद्देतीन लाख १२ हजार रूपयांची बॅग लंपास किराणा मालाच्या व्यापाऱ्यास लुटले

जालना : दुचाकीवरुन आलेल्या तीन भामट्यांनी जालन्यातील मोंढ्यात एका व्यापाऱ्याचे तीन लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली.शहरातील बाजार समितीच्या परिसरात सोमवारी दुपारी दोन वाजता भोकरदन तालुक्यातील धावडा येथील किराणा मालाचे व्यापारी खालेदखान अक्रमखान पठाण यांची तीन लाख १२ हजार रूपयांची बॅग लंपास केली. मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी ही लूट केल्याचे पठाण यांनी सांगितले. मोंढा परिसरात किराणा माल खरेदीसाठी पठाण जालन्यात आले होते. 

दुपारी नेहमीप्रमाणे पठाण हे त्यांची बॅग घेऊन व्यापाऱ्याकडे जात होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरून तीनजण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने  जोरदार धक्का दिला, तर दुसऱ्याने त्यांच्या हातातील बॅग लंपास केली. तिसरा गाडी सुरू ठेवून उभा होता. काही कळण्याच्या आत चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. पठाण यांनी आरडाओरड केली. परंतु उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती चंदनझिरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे व त्यांच्या सहकाऱ्यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मोंढ्यात येऊन पाहणी केली. शेजारील चार ते पाच दुकानांच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. परंतु यात सायंकाळपर्यंत कोणालाही अटक केली नाही. 

मोंढ्यात लुटीची चौथी घटना गेल्या दोन ते तीन वर्षात जालन्यातील या मोंढ्यात व्यापारी तसेच बँकेची रोख रक्कम लुटण्याची ही चौथी घटना आहे. असे असले तरी व्यापारी तसेच बाजार समितीने मागणी करूनही या भागात पोलीस चौकी उभारलेली नाही. जालन्यात दररोज कोट्यवधीचा व्यवसाय होतो. हे माहित असूनही पोलिसांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी पोलिसांची रात्री आणि दिवसाही गस्त होत असे, परंतु आता ही गस्त होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाPoliceपोलिस