शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संतांच्या विचारांचे आचरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

आंबा : जीव, शिव आणि संत यांचे जगात येण्याचे ठिकाण जरी एक असले तरी, प्रयोजन मात्र वेगवेगळे आहे. जीव ...

आंबा : जीव, शिव आणि संत यांचे जगात येण्याचे ठिकाण जरी एक असले तरी, प्रयोजन मात्र वेगवेगळे आहे. जीव आणि शिव यांच्या कार्यापेक्षा संताचे कार्य वेगळे आहे. जीवाला शिवापर्यंत पोहचण्याचे नव्हे तर जीवाचा शिव आणि शिवाची मुक्तता करण्याचे काम संत करत असतात. संत सहसा ओळखले जात नाहीत. संतांना ओळखण्यासाठी वेगळी दृष्टी, वेगळा दृष्टीकोन अंगीकृत करावा लागतो. संत झाल्याशिवाय किंवा संतांच्या विचारांचे आचरण केल्याशिवाय संत ओळखता येत नाहीत, अनुभवता येत नाहीत, असे प्रतिपादन ह.भ.प. कृष्णा महाराज शिंदे शहापूरकर यांनी केले.

दैठणा येथील गंगाभारती संस्थानच्या हरीनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. अध्यात्म आणि धार्मिकता यातील फरक स्पष्ट करताना शिंदे महाराज म्हणाले, अध्यात्माला कोणत्याही धर्माची चौकट नसते. अध्यात्मात केवळ भाव महत्वाचा समजला जातो. अध्यात्म वाढत केला की, समाजात नेकी, बंधूभाव आणि परस्पर प्रेम वाढते.

धार्मिकता मग ती कोणत्याही धर्माची असो, कट्टरतेच्या दिशेने वाढली तर ती विकासाला मारक आणि विनाशाला पूरक ठरत असते. धर्माचे खरे सार बाजूला राहून धार्मिक कट्टरता वाढल्याने धर्म-धर्मामध्ये होणाऱ्या संघर्षामध्ये वाढ होऊ लागली आहे. याबाबत प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

जीवनात परमार्थ आणि प्रपंच या दोन भिन्न बाबींमध्ये समन्वय साधून जीवन मुक्तीचा मार्ग दाखविण्याचे कार्य संत करत असतात. संताच्या या कार्यामुळेच ते जीव आणि शिव यांच्यापेक्षा वेगळे ठरतात. अनेक दृष्टातांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कीर्तनरुपी विचार उपस्थितांना पटवून दिले.

यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

फोटो