मंठ्यात चोरटे आले अन् पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:48 IST2019-08-05T00:47:16+5:302019-08-05T00:48:02+5:30

चोरट्यांचा घरफोडीचा डाव मंठा पोलिसांनी उधळून लावत एका दुचाकीसह कार ताब्यात घेतली. पोलिसांनी पाठलाग केल्याने वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला.

The thieves came and ran away | मंठ्यात चोरटे आले अन् पळाले

मंठ्यात चोरटे आले अन् पळाले

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चोरट्यांचा घरफोडीचा डाव मंठा पोलिसांनी उधळून लावत एका दुचाकीसह कार ताब्यात घेतली. पोलिसांनी पाठलाग केल्याने वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा शहरातील तुकाराम नगर भागात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, गस्तीवर असलेल्या पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला. पोनि विलास निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करीत असल्याने चोरट्यांनी दुचाकीवरून व चारचाकी वाहनातून मंठा टी पॉइंट, जिंतूर रोड ते तळणी मार्गापर्यंत पळ काढला. मात्र, पोलीस पाठलाग करीत असल्याने निळकंठेश्वर मंदिराजवळ वाहने सोडून चोरट्यांनी शेतशिवारातून पळ काढला. पोलिसांनी एका विना नंबरच्या कारसह एक दुचाकी (क्र. एम.एच.२८- ए.एच.२७७३) ताब्यात घेतले. या प्रकरणी चोरट्यांविरूध्द मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The thieves came and ran away