राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:47 IST2019-08-09T00:46:41+5:302019-08-09T00:47:00+5:30

आदर्शनगर मध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा संजय लहाने यांच्या घरी गुरुवारी दुपारी चोरी झाली.

Theft of NCP's district chief's house | राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षांच्या घरी चोरी

राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षांच्या घरी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शहरातील आदर्शनगर मध्ये राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा संजय लहाने यांच्या घरी गुरुवारी दुपारी चोरी झाली. यावेळी ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. जाफराबाद शहरात भरदिवसा घरफोडी होण्याचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभा केले आहे.
शहरातील आदर्श नगरमधील मुख्य रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा संजय लहाने, जिजाऊ मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय लहाने यांचे घर आहे. गुरूवारी दुपारी चोरट्यांनी या घराचा कडीकोयंडा तोडून आतील रोख १८ हजार रूपये व सोन्याचे दागिने, असा ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोनि शिरीष हुंबे, पोउपनि पठारे, ईश्वर देशपांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संजय लहाने यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.

Web Title: Theft of NCP's district chief's house