कुटुंब नियोजन शिबिरात १०० महिलांवर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:27+5:302021-01-25T04:31:27+5:30

पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास २०१९-२०२० ला कुटुंबकल्याण नियोजनाअंतर्गत २४० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, मागील काळात ...

Surgery on 100 women in family planning camp | कुटुंब नियोजन शिबिरात १०० महिलांवर शस्त्रक्रिया

कुटुंब नियोजन शिबिरात १०० महिलांवर शस्त्रक्रिया

Next

पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास २०१९-२०२० ला कुटुंबकल्याण नियोजनाअंतर्गत २४० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, मागील काळात देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. यावेळी सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच उपक्रमांना तात्पुरती स्थगित दिली होती. आता लॉकडाऊनची अट शासनाने शिथील केली आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने शासनाने ठरवून दिलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेला प्रारंभ केला. यामध्ये परिसरातील लिंगेवाडी, चोहाळा, पिंपळगाव रेणुकाई, रेलगाव, वरुड (बु), विरेगाव, पारध, बाभूळगाव, सिपोरा आदी गावांमधील १०० महिलांवर टाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्जन हिना, समुदाय वैद्यकीय अधिकारी सिद्दीकी, पिंपळगाव रेणुकाई येथील वैद्यकीय अधिकारी सतीश बावस्कर, के. एम. शिंदे, डी. एस. इंगळे, जी.एम. देशपांडे, एम. ए. रायलकर, ए.एम. ठोंबरे, एस. बी. किरनाके, एम.डी. खेसर, आर.आर. फदाट, एस.एन. पांढरे, आर.टी. राकडे, ए.ए. बोर्डे, एन.पी. पोटे, निर्मला बावस्कर, एम.एच. बिद्दाल, एस.बी. सपकाळ, ए.एम. शिहरे, शेख जुबरे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Surgery on 100 women in family planning camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.