शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
4
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
6
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
7
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
8
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
9
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
10
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
11
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
12
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
13
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
14
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
15
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
16
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
17
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
18
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
19
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
20
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
Daily Top 2Weekly Top 5

'भुजबळ जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी २० कोटी दिले!'; जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:19 IST

प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार! पण इतकी व्यक्तिगत टीका करणे योग्य आहे का? नेत्यांनी मर्यादा पाळावी.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र टीकास्त्र सोडत त्यांच्या राजकीय पाठिंब्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'तुम्ही जेव्हा तुरुंगातून बाहेर आलात, तेव्हा मराठा समाजानेच तुम्हाला आर्थिक मदत केली. सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला २० कोटी रुपये दिले, तेव्हा तुम्ही अन्न-पाण्याला लागलात, अन्यथा तुम्हाला पुन्हा भाजी विकावी लागली असती,' अशी परखड टीका जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली.

ओबीसी नेत्यांना उद्देशून बोलताना जरांगे म्हणाले, "तुमचा इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आम्ही मोजीतही नाही." ते पुढे म्हणाले की, "तुम्हाला कोणी सांगितले की ते ओबीसी नेते आहेत म्हणून? ते फक्त एका विशिष्ट जातीचे नेते आहेत आणि त्यांच्या आजच्या मोर्चात एका विशिष्ट जातीचेच लोक सहभागी होणार आहेत. ते खरे ओबीसीचे शत्रू आहेत," अशी थेट टीका जरांगे यांनी केली.

'हा ओबीसीला महापापी लागला आहे'काही ओबीसी नेत्यांच्या पूर्वीच्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनावर टीका करताना जरांगे म्हणाले, "बरं झालं तुम्ही शाळेत गेला आणि बाकीचे शाळेत जात नव्हते. बराच काळ जेलमध्ये गेलात. हा माणूस ओबीसीला महापापी लागला आहे." आरक्षणाला विरोध करणाऱ्या या नेत्यांमुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

'मराठवाड्यातील मराठ्यांसाठीच आहे जीआर'ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आरक्षणाचा जीआर केवळ मराठवाड्यासाठी आहे. "आता शेतकऱ्यांवर संकट आहे, जीआर मराठवाड्यासाठी आहे आणि संकट देखील मराठवाड्यावरच आले आहे. आता शेतकरी मोकळे झाल्यावर अर्ज करतील," असे त्यांनी सांगितले. जरांगे यांनी लोकशाही मार्गाने मोर्चे काढणे, आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र, त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाचे सर्व जिल्हे बालेकिल्ले असून, मराठा समाज एकत्र आहे, हे देखील अधोरेखित केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange alleges Supriya Sule gave Bhujbal ₹20 crore after jail release.

Web Summary : Manoj Jarange Patil accused Supriya Sule of giving Chhagan Bhujbal ₹20 crore after his release from jail. Jarange criticized certain OBC leaders, alleging they oppose reservation and harm the OBC community, and clarified that the GR is only for Marathwada.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळSupriya Suleसुप्रिया सुळे