शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

रामनामात अलौकिक शक्ती : संतोष महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST

भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. ...

भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पिडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरांनी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली. राम नावात अलौकिक शक्ती असून, ही दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहेत, असे प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज आढवणे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील मुठाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. संतोष आढवणे यांची सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा पार पडली. यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून रामनाम भक्तीचे महत्त्व विशद केले. रामनाम पुरातन असले तरी ते नित्यनूतन आहे. त्या नामाची गोडी कमीच होऊ शकत नाही. नुसत्या रामनामाने वाल्मिक ऋषींचा उद्धार झाला. रामनामाचे लिखाण दगडावर केले तर दगडसुद्धा समुद्रावर तरले. जर रामनामाने दगड तरत असतील असतील तर निश्चितच आपण इहलोकाचा संसाररूपी सागर पार करत असताना रामनामाला आपल्या कंठी राम नाम धारण केले तर निश्चितच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती.

शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे पण कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पीडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरानी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली राम ही एकमेव दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहे.

फोटो