रामनामात अलौकिक शक्ती : संतोष महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:19+5:302021-02-14T04:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी ...

Supernatural power in Ramnama: Santosh Maharaj | रामनामात अलौकिक शक्ती : संतोष महाराज

रामनामात अलौकिक शक्ती : संतोष महाराज

लोकमत न्यूज नेटवर्क

भोकरदन : शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे. कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पिडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरांनी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली. राम नावात अलौकिक शक्ती असून, ही दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहेत, असे प्रतिपादन ह. भ. प. संतोष महाराज आढवणे यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील मुठाड येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह. भ. प. संतोष आढवणे यांची सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा पार पडली. यावेळी त्यांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून रामनाम भक्तीचे महत्त्व सांगितले. रामनाम पुरातन असले तरी ते नित्यनूतन आहे. त्या नामाची गोडी कमीच होऊ शकत नाही. नुसत्या रामनामाने वाल्मिक ऋषींचा उद्धार झाला. रामनामाचे लिखाण दगडावर केले तर दगडसुद्धा समुद्रावर तरले. जर रामनामाने दगड तरत असतील असतील तर निश्चितच आपण इहलोकाचा संसाररूपी सागर पार करत असताना रामनामाला आपल्या कंठी धारण केले तर निश्चितच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते.

शास्त्रात नवविधा भक्तीचे अलौकिक महत्त्व पटवून दिले आहे पण कलियुगात फक्त रामनामरूपी भक्तीच आपल्याला दुःखरूपी जाचातून सोडवू शकते. जेव्हा भगवान शंकरांनी हलाहल विष प्राशन केले तेव्हा त्यांना अत्यंत पीडा व त्रास होऊ लागला तेव्हा भगवान शंकरानी रामनाम आपल्या कंठात धारण केले तेव्हाच विषाचा दाह शांत होऊन शीतलता लाभली. राम ही एकमेव दोन अक्षरे त्रैलोक्याला पावन करणारी आहेत.

फोटो

Web Title: Supernatural power in Ramnama: Santosh Maharaj