शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्टीलचे दर अकरा हजारांनी घसरले; स्टील सिटीतील उद्योजक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:23 IST

स्टील सिटीत उद्योजकांची चिंता वाढली असून, दर घसरण्यासह आता वीजबिलातील सवलतही या महिन्यापासून मिळणार नसल्याने संकटात आणखी वाढ झाली आहे. 

जालना : मध्यंतरी स्टीलच्या दरात आलेली बूम झपाट्याने खाली आली आहे. ६१ हजार रुपये प्रतिटनावरून हे दर थेट सर्व करांसह ४९ हजार रुपये टनावर येऊन ठेपले आहेत. यामुळे स्टील सिटीत उद्योजकांची चिंता वाढली असून, दर घसरण्यासह आता वीजबिलातील सवलतही या महिन्यापासून मिळणार नसल्याने संकटात आणखी वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या स्टील उद्योगाने अनेक संकटांवर मात करून  मोठ्या धीराने हा उद्योग सुरू केला. मोठ्या प्रमाणावर मागणीपूर्व उत्पादन घेतले. परंतु नंतर राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या तीन टक्के सवलतीचा मोठा लाभ रिअल इस्टेट क्षेत्राला झाला. त्यामुळे बांधकाम क्षेत्र वेगाने वाढले. परिणामी स्टीलची मागणी वाढली. मात्र, गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये स्टीलच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने उद्योजकांची चिंता वाढली आहे. दरकपातीसह जीएसटी विभागाचा ससेमिरादेखील माेठी डोकेदुखी ठरत आहे.   एकीकडे दरातील घट आणि दुसरीकडे वीजबिलात मिळणारी एक ते दीड टक्के सवलतही आता रद्द होणार आहे. त्यामुळे किमान ती तरी कायम ठेवावी, अशी मागणी येथील उद्योजकांची असून, यासंदर्भात ते पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांच्या माध्यमातून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेणार आहेत.    सेकंडरी स्टीलचा मुद्दा गौणराज्यातील नामांकित स्टील उद्योजकांचे स्टील हे प्रायमरी मानले जाते. या मुद्द्यावर एसएमई स्टील उत्पादक संघटनेने पाेलाद मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. एसएमई  स्टील उत्पादन करणारे उद्योजकही बड्या कंपन्यांप्रमाणेच उत्पादनासंदर्भात सर्व ते तांत्रिक निकष पाळून दर्जेदार स्टील निर्माण करतात. परंतु आम्हाला सेकंडरी स्टील म्हणून नाकारले जाते. ही बाब गंभीर आहे. यावर पाेलाद मंत्रालयातील सचिव रसिका चोबे यांनी पत्र देऊन सरकारदरबारी प्रायमरी आणि सेकंडरी अशी वर्गवारी केलेली नसल्याचे म्हटले आहे.   - योगेश मानधनी, अध्यक्ष, स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, महाराष्ट्र