शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस मिळताच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत ...

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी फळबागांचा विमा भरूनही इंडिया इन्शुरन्स कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत जिल्हा ग्राहक मंचची नोटीस जातात विमा कंपनीने बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पैसे जमा केले.

तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांनी फळबागेच्या विम्यापोटी मोसंबी एक हेक्टरसाठी ३८०० रुपये, तर ६० गुंठे केळीसाठी ३९६० रुपये भरले होते, तर गणेश वाजे यांनी ९७ गुंठे मोसंबीचा ३ हजार ७३४ रुपये व ६० गुंठे केळीचा ३९६० रुपये असा दोन्ही शेतकऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे विमा भरला होता. तो मंजूरही करण्यात आला. काही शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले; परंतु या दोन्ही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळालेच नाहीत. विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी व कंपनीकडे लेखी तक्रारी केल्या, तरीही कंपनीकडून टाळाटाळ होत होती. त्यानंतर दोन्ही शेतकऱ्यांनी अ‍ॅड. प्रदीप जाधव, अ‍ॅड. मयूर ढवळे यांच्या मार्फत ग्राहक मंचात तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीने पहिली नोटीस घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी दुसरी नोटीस पाठविण्यात आली. दुसऱ्या नोटिसीची तामील होताच कंपनीचे धाबे दणाणले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्यात आली.

...अखेर मिळाला न्याय

इंडिया इन्शुरन्स कंपनीला नोटीस मिळताच कंपनीने तीर्थपुरी येथील शेतकरी विठ्ठल वाजे यांच्या खात्यावर मोसंबीचे एक हेक्टरचे २५ हजार ८०० व व ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे ६५ हजार ४०० रुपये जमा केले, तर गणेश वाजे यांच्या ९७ गुंठे मोसंबीचे २५ हजार २६ रुपये, तर ६० गुंठे केळीचे ३९ हजार ६००, असे एकूण ६४ हजार ६२६ रुपये बँक खात्यात जमा केले.