शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST

अंबड : तालुक्यात कापसाचा हंगाम सुरू आहे. कापूस खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवतीने तालुक्यात चार ठिकाणी सीसीआयची केंद्र ...

अंबड : तालुक्यात कापसाचा हंगाम सुरू आहे. कापूस खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीवतीने तालुक्यात चार ठिकाणी सीसीआयची केंद्र सुरू करण्यात आली आहे. या चार केंद्रावर आतापर्यंत ८५ हजार ७६८ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले. यामुळे कपाशीच्या उत्पन्नात घट झाली. अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या कापसाची वेचणी शेतकºयांनी केली. अनेक भागात पहिल्याच वेचणीत कापूस संपला. कमी उत्पादन झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच खासगी व्यापारी बेभाव कापसाची खरेदी करीत होते. तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व कृउबाचे सभापती सतीश होडे यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेऊन तालुक्यातील दुनगाव, शहागड, अंबड येथे दोन शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ज्या शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यांचा कापूस खरेदी केला जात असल्याची माहिती कृऊबाचे सचिव बाबासाहेब सोळुंके यांनी दिली. मागील महिन्यापासून तालुक्यात कापसाची खरेदी केली जात आहे. दूनगाव येथील केंद्रात आतापर्यंत ११५५ शेतकºयांचा २९०७५.९० क्विंटल, अंबड येथील सुरज अ‍ॅग्रो येथे २७५ शेतकºयांचा ७३ ६०.४० क्विंटल तर शहागड येथील केंद्रात १७५४ शेतकºयांचा ३९८८२.६५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अंबड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदी केंद्रावर ४४३ शेतकºयांचा ९४५१.२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाबासाहेब सोळुंके यांनी दिली.

फोटो

शहागड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेला कापूस.