शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

"...तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते, २७-२८ वर्षांत काय मिळालं आम्हाला? लक्ष देऊन ऐका"; हाकेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 19:21 IST

"या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." 

मिस्टर जरांगे, हू इज अ लॉ मेकर अँड हू इज अ लॉ इम्प्लिमेंटर? आमदार कोण? खासदार कोण आणि मुख्यमंत्री कोण? मराठेच ना? ओबीसींना एक टक्का बजेटही तुम्ही देत नाही. कुणी कुणाचं खायचा प्रश्न येतो. जरांगे, जर ओबीसींनी खाल्ल असेल, ७० वर्ष म्हणतोस तू, सोडून दे, २७-२८ वर्षांपूर्वी ओबीसींना आरक्षण मिळालं आहे. औबीसींनी रिझर्व्हेशन खाल्ल असतं, तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात २०० साखर कारखाने आहेत. १०० सहकारी आणि १०० खासगी त्यांतील १०-१५ कारखाने सोडले तर ९० टक्के कारखाने केवळ मराठा समाजाचे आहेत," अशा शब्दात ओबीसी आरक्षणाचे नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला. ते जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे पत्रकारांशी बोलत होते.

१ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही -हाके म्हणाले, "७० वर्ष कुणाचे खाण्याचा प्रश्नच येत नाही आणि २७-२८ वर्षांत काय मिळाले आम्हाला? लक्ष देऊन सर्वांनी ऐका. ते नेहमीच आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष करताना म्हणतात की, भुजबळ तू सगळ खाल्लय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, या महाराष्ट्रात कालचं बजेटसुद्धा, म्हणजे अगदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा, ६० टक्के ओबीसींना १०० टक्क्यांपैकी १ टक्का बजेटही या महाराष्ट्राने राबवले नाही." 

राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्यासाठी जनता आहे ना, तू कोण? -"ओबीसी आणि मराठा समाजात काडी खऱ्या अर्थाने छगण भुजबळ यांनी लावली आहे, त्यांची राजकीय कारकिर्द उद्धवस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही, असे जरांगे म्हणत आहेत, असे विचारले असता, हाके म्हणाले, "राजकीय कारकीर्द उद्धवस्त करण्यासाठी जनता आहे ना, तू कोण? राजकीय कारकीर्द उद्धवस्त करणार? या महाराष्ट्रातला ओबीसी, व्हीडेएनटी, एसबीसी, एक झाला आणि त्या लोकांनी स्वाभिमानाला मत दिलं, तर जरांगे काळ ठरवेल फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे ते?" 

मग नक्की जातीयवादी कोण? -"जरांगे यांच्या जातीवादासंदर्भातील विधानावर बोलताना हाके म्हणाले, जरांगे तुम्ही म्हणताय, जातीवाद केला नाही. भुजबळ असतील, लक्षमण हाके असेल, महादेव जाणकर असतील, गोपिचंद पडळकर असतील, मुंडे बंधू भगिणी असतील, वडेट्टीवार असतील, ही माणसं जाती उपजातींसह महाराष्ट्रातील ४९२ जातींची भाषा बोलतात आणि तुम्ही केवळ एकाच जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण?" असा सवालही यावेळी हाके यांनी जरांगेंना केला.

    

 

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण