शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब...अवकाळीने सर्वच हिरावले; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 12:45 IST

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली.

ठळक मुद्देएकरी २० हजाराची मागणी 

जालना : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने आमचे मोठे नुकसान झाले असून आता शिल्लक कपाशी वेचण्यासाठी मजूर मिळण  अवघड झाले आहे. रबी पेरणीही आता शक्य नसल्याने आम्हाला एकरी किमान २० हजाराची मदत मिळावी, अशी मागणी जालना तालुक्यातील दरेगाव येथील महिला शेतकरी शांताबाई शेळके, कैलास ढवळे या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांकडे  केली. 

पथकातील अधिकाऱ्यांनी कपाशी, मका तसेच बाजरीची पाहणी केली. तर गवळी पोखरी शिवारातील द्राक्ष बागांचीही पथकाने पाहणी केली.  या पथकाने कडेगाव, चांदई एक्को, अकोलादेव येथेही भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. पथकाचे  प्रमुख केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव डॉ. वी. तिरुपगल  व त्यांच्यासोबत डॉ. के मनोहरण, उपायुक्त सदानंद टाकसाळे, विभागीय सहसंचालक कृषी साहेबराव दिवेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय अधिकारी केशव नेटके,  तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तालुका  कृषी अधिकारी  सुखदेव  उपस्थित होते. 

यावेळी  दरेगाव येथील मका उत्पादक शेतकरी कैलास ढवळे यांच्या शेतात मका तसाच पडून होता. आता तुम्ही रबीची पेरणी करणार काय, यावर शेतकऱ्यांनी आता वेळ निघून गेल्याचे सांगून आता हे शक्य नसल्याचे सांगितले. दरेगाव येथील शांताबाई शेळके यांच्या शेतातील कपाशीची पाहणी केली. शेतात जाताना आजही पाण्याचा वापसा न  झाल्याने अधिकाऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागला. यावेळी दीड एकर कापूस आम्ही लावला  होता, असे सांगून यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे सांगितले.  गवळी पोखरी शिवारातील  दीपक गंडाळ यांच्या द्राक्ष बागेत  मोठे विदारक चित्र त्यांना दिसून आले. यावेळी गवळी पोखरी गावात न जाता रस्त्यावरील शिवारातच अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा थांबून त्यांनी अवघ्या दहा मिनिटातच एक, दोन प्रश्नोत्तर विचारून पथक सुसाट निघून गेले. यावेळी गवळी पोखरीचे सरपंच गणेश वाघमारे, रवी कायंदे,  विधाते व शेतकरी नाराज झाले होते.

कापूस वेचणीला मजूर मिळेनाकापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याची बाबही पथकाच्या लक्षात आणून देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी दिवेकर हे शेतकऱ्यांना मराठीतून प्रश्न विचारून नंतर ते पथकातील अधिकाऱ्यांना इंग्रजीतून भाषांतर करून सांगत होते. पीकविमा काढला आहे काय असा सवालही यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी केल्याचे दिसून आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकार