जालना शहरात शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:40 IST2020-12-30T04:40:41+5:302020-12-30T04:40:41+5:30

जालना : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याचा शिवसेनेच्यावतीने भोकरदन ...

Shiv Sena protests in Jalna city | जालना शहरात शिवसेनेची निदर्शने

जालना शहरात शिवसेनेची निदर्शने

जालना : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याचा शिवसेनेच्यावतीने भोकरदन नाका येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.

केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग या शासकीय संस्थांचा गैरवापर त्वरित थांबवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख आत्मानंद भक्त, विष्णू पाचफुले, माजी नगरसेवक बाला परदेशी, नगरसेवक अशोक पवार, विजय पवार, निखिल पगारे, नितीन जांगडे, संदीप नाईकवाडे, गोपीकिशन गोगडे, दुर्गेश काठोठीवाले, दीपक रननवरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अंबेकर म्हणाले की, राज्यात सत्तांतर झाल्यापासून केंद्र शासन विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी केंद्र शासन अखत्यारित असलेल्या संस्थांचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करीत आहेत. ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा विविध संस्थांचा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सर्रास वापर केला जात आहे. या सर्व संस्था सत्ताधारी कार्यकर्त्यांप्रमाणे कार्य करीत आहेत. देशात त्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. ही बाब अत्यंत निंदनिय आहे. केंद्र शासनाने घटनात्मक संस्थांचा होणारा दुरुपयोग त्वरित थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राजू घोडे, राजेंद्र परदेशी, राजू वैद्य, गौरव संत, राजेक कुरेशी, जान मोहमद कुरेशी, गणेश लाहोटी, अमोल कटारिया, राजू इंगळे, राम खांडेभराड, प्रशांत जगताप, शिवाजी मुळे, विकास क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Shiv Sena protests in Jalna city