एक अल्पवयीन मुलगी १५ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी परतूर येथील महाविद्यालयात गेली होती. त्याच वेळी अल्पवयीन आरोपी याने मुलीला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. या अगोदरही छेड काढून त्रास दिला होता. तिने घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. शिक्षकांनी पीडित मुलीच्या वडिलांना व आरोपीच्या वडिलांना बोलवून घेतले. त्यानंतर, परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, सहायक सरकारी वकील अॅड.वर्षा मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स.गो. देशमुख यांनी अल्पवयीन आरोपीला ३५४ भादंविनुसार दोन वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची अॅड.वर्षा मुकीम यांनी दिली.
विनयभंगप्रकरणी तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST
एक अल्पवयीन मुलगी १५ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी परतूर येथील महाविद्यालयात गेली होती. त्याच वेळी अल्पवयीन आरोपी याने ...
विनयभंगप्रकरणी तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}