सेलगाव येथील शाळेत चंदन कन्यादान वृक्षारोपण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:28+5:302021-02-13T04:29:28+5:30

मुलींना चंदनाचे रोप दिले जाते भेट आष्टी / सातोना खु : परतूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ...

Sandalwood Kanyadan tree planting activities in the school at Selgaon | सेलगाव येथील शाळेत चंदन कन्यादान वृक्षारोपण उपक्रम

सेलगाव येथील शाळेत चंदन कन्यादान वृक्षारोपण उपक्रम

मुलींना चंदनाचे रोप दिले जाते भेट

आष्टी / सातोना खु : परतूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चंदन कन्यादान वृक्षारोपण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत परिसरातील जवळपास २६० मुलींना एक चंदनाचे रोप भेट देण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींना चंदनाच्या झाडाचे महत्त्व सांगण्यात आले. ‌‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संतांनी सांगितलेल्या ओळीचे महत्त्व डॉ.सतीश लिपणे यांनी सांगितले. याप्रसंगी विष्णुपंत लिपणे, डॉ.सतीश लिपणे, डॉ.संतोष सोळंके, पी.डी. माने, व्ही.पी. बोसळे, अमृत सोळंके, प्रभाकर काळे, त्रिंबक गायकवाड, रमेश लिपणे, राजेभाऊ मानकर, श्रीमंत थोरात यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी.बी. चाटे, ए.व्ही. गायकवाड, डी.आर. खरात, बी.बी. कोळपे, ए.व्ही. मिसाळ यांनी परीश्रम घेतले.

Web Title: Sandalwood Kanyadan tree planting activities in the school at Selgaon