शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

विसरलेला जेवणाचा डबा ठरला वरदान; जखमी रेवती यांनी सांगितला 'समृद्धी' अपघाताचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:46 IST

बसायचं, तेवढ्यात गाडी धडकली अन् आम्ही बाजूला पडलो

जालना: "आम्ही काम संपवून गाडीत बसत होतो, तेवढ्यात पाठीमागून आलेल्या कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. मी बाजूला फेकले गेले आणि त्यानंतर मला काहीच समजले नाही..." अशा शब्दांत समृद्धी महामार्गावरीलअपघाताचा भीषण थरार जखमी रेवती योगेश मदन (रा. केळीगव्हाण) यांनी सांगितला. जालना येथील कलावती रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी 'लोकमत'शी बोलताना त्या काळरात्रीची भयावह परिस्थिती मांडली.

या अपघातातून काही जणी सुदैवाने बचावल्या असल्या तरी, त्यांच्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना त्यांच्या मनातून जात नाहीये.

एका डब्यामुळे वाचला जीवकेळीगव्हाण येथीलच कासाबाई मदन यांच्यासाठी विसरलेला जेवणाचा डबा चक्क 'जीवनदान' ठरला. सर्व महिला काम संपवून पिकअपमध्ये बसत असताना, कासाबाई यांचा डबा विसरला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या डबा आणण्यासाठी गाडीतून उतरून थोड्या अंतरावर गेल्या. नेमक्या त्याच क्षणी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने उभ्या असलेल्या पिकअपला चिरडले. डबा आणायला गेल्यामुळे कासाबाई या भीषण मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्या, मात्र आपल्या सहकाऱ्यांची अवस्था पाहून त्या आजही प्रचंड धक्क्यात आहेत.

"रुग्णालयात आल्यावर सगळं समजलं"रेवती मदन यांनी सांगितले की, "गाडी रस्त्यावर थांबलेली होती. काही महिला आत बसल्या होत्या, तर मी आणि कविता चौधरी गाडीत बसत होतो. धडक इतकी जोरात होती की आम्ही लांब फेकले गेलो. कविता यांना गंभीर मार लागला आहे. मला रुग्णालयात शुद्ध आल्यानंतर समजले की आमचे अनेक सोबती आता या जगात नाहीत." या अपघातात रेवती यांच्या सासू कडूबाई मदन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मृतांचा आकडा आणि जखमींची अवस्थासमृद्धी महामार्गावरील या अपघाताने संपूर्ण जालना जिल्हा हादरला आहे. ८ महिलांचा बळी घेणारा हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या जखमी महिलांवर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, डोळ्यादेखत आपल्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मरताना पाहिल्याचा मानसिक आघात या महिलांवर मोठा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Forgotten lunchbox a blessing: Survivor recounts Samruddhi highway horror.

Web Summary : A Samruddhi highway accident survivor recounts the horrific collision. A forgotten lunchbox saved one woman when a container truck struck their pickup. Eight women died in the incident, leaving survivors traumatized. Police are investigating the cause of the crash.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघातJalanaजालना