शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी' अपघात: ४०० रुपयांच्या रोजंदारीने घेतला आदमाने कुटुंबातील ३ कष्टकरी महिलांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:42 IST

आदमाने कुटुंबावर काळाचा घाला; गावात नियमित रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कमच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती.

जालना : तालुक्यातील निधोना येथील आदमाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात कुटुंबातील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५) आणि कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०) या सख्ख्या जावा असून, सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०) या त्यांच्या चुलत सासू होत्या. या तिघींचीही घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्या तीन महिन्यांपासून एकमेकींसोबत समृद्धी महामार्गावर ४०० रुपये रोजंदारीवर साफसफाईचे काम करण्यासाठी जात होत्या.

अलकाबाई आदमाने यांना तीन मुले असून, त्यांचे पती मोलमजुरी करतात. कांचनबाई आदमाने यांना असलेल्या एका मुलाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, त्या पतीसोबत पत्राच्या शेडमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीवरही कुटुंबाची जबाबदारी असून, तेदेखील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुमनबाई आदमाने यांना तीन मुले असून, तिघेही विवाहित आहेत.

अन् क्षणातच “होत्याचं नव्हतं झालं”दरम्यान, १ एप्रिल रोजी सायंकाळी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात या तिघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आदमाने कुटुंबावर काळाने घाला घातला असून, क्षणातच “होत्याचं नव्हतं झालं” अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण निधोना गाव शोकसागरात बुडाले असून, कुटुंबाच्या दु:खात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

रोजंदारी कुटुंबासाठी जीवनरेषासमृद्धी महामार्गावर साफसफाईच्या कामासाठी महिलांना दररोज ४०० रुपयांची रोजंदारी मिळत होती. गावात नियमित रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कमच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती. घरातील खर्च, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्या जीव धोक्यात घालून हे काम करीत होत्या. काम केले तरच पैसे मिळत असल्याने एकही दिवस सुट्टी घेणे त्यांना परवडत नव्हते. मात्र, कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन कमी असूनही गरिबीमुळे त्यांनी हा पर्याय स्वीकारला होता. हीच रोजंदारी त्यांच्या कुटुंबासाठी जीवनरेषा ठरत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Samruddhi Accident: ₹400 Daily Wage Claims Lives of 3 Women

Web Summary : Three women from Nidona died in a Samruddhi Highway accident. Earning ₹400 daily cleaning the highway, they were the family's lifeline. The tragedy has plunged the village into mourning, highlighting the plight of impoverished families.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गJalanaजालनाDeathमृत्यू