रांजणीच्या सरपंचांची गुरुवारी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:16+5:302021-02-10T04:31:16+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत अमोल देशमुख गटाचे सर्वाधिक पंधरा सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना गटाचे श्यामराव देशमुख यांचे दोन सदस्य ...

Ranjani sarpanch elected on Thursday | रांजणीच्या सरपंचांची गुरुवारी निवड

रांजणीच्या सरपंचांची गुरुवारी निवड

ग्रामपंचायत निवडणुकीत अमोल देशमुख गटाचे सर्वाधिक पंधरा सदस्य विजयी झाले आहेत. तर शिवसेना गटाचे श्यामराव देशमुख यांचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. या निवड प्रक्रियेत अमोल देशमुख यांची सरपंचपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. रांजणी ग्रामपंचायतीत मावळत्या सभागृहातील तीन सदस्य पुन्हा विजयी झाले आहेत. यामध्ये शेख रहिम अब्दुला यांनी हॅट्‌ट्रिक साधली आहे. त्यामुळे त्यांची उपसरपंचपदाची निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, या ग्रामपंचायत निवडणुकीत युवकांनी बाजी मारली आहे. अमोल देशमुख हे मावळत्या सभागृहातील सदस्य आहेत. तर उपसरपंचपदाची धुरा येण्याची शक्यता असलेले शेख रहिम यांनी हॅट्‌ट्रिक साधली आहे. दोन्ही सदस्य उच्च शिक्षित असल्याने गावातील विविध प्रश्न मार्गी लागण्याची आशा ग्रामस्थांना आहे.

Web Title: Ranjani sarpanch elected on Thursday