शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:13 IST

शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जालना : बहुचर्चित परभणी ते छत्रपती संभाजीनगररेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने २ हजार १७९ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे; परंतु जालना जिल्ह्यात अद्याप दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अंकाई ते परभणी हा रेल्वे मार्ग ‘सिंगल लाइन’ रेल्वे मार्ग होता. अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला २०२३ च्या मे महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाच्या कामासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी. यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २ हजार १७६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

जमीन संपादनाची प्रक्रिया नाहीपरभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. जालना जिल्ह्यातून सुमारे ७० किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. जालना जिल्ह्यातील जालना, घनसावंगी, परतूर व बदनापूर या तालुक्यांतून रेल्वे मार्ग जातो. या रेल्वे मार्गावर जालना, परतूर, रांजणी, बदनापूर अशी महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. मागील वर्षी दक्षिण मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. यात जालना, परतूर आणि अंबड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर अधिसूचनेद्वारे भूसंपादनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मात्र, नेमकी जमीन कोणती संपादित करायची याविषयीची अधिसूचना अद्याप रेल्वेकडून प्रकाशित करण्यात आलेली नाही. ही अधिसूचना काढल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दुहेरी मार्गासाठी २०२७ उजाडणारपरभणी ते छत्रपती संभाजीनगर हा सिंगल ट्रॅकचा रेल्वे मार्ग आहे. याच ट्रॅकवरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वे धावतात. यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यात दक्षिण मध्य रेल्वे उत्सुक नसते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर अनेक जलदगती रेल्वेसह गाड्यांची संख्या वाढणार आहे. नांदेड ते परभणी मार्गावरील दुहेरीकरण यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आता परभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरीकरणास मार्गास मंजुरी देण्यात आलेली आहे. हा मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर