शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:45 PM

कार्यक्षेत्राबाहेरील परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कार्यक्षेत्राबाहेरील परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यांतर्गत १२६ शेतकºयांकडील २९ लाख रूपयांचे परवानाधारक सावकारांचे कर्ज माफ होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.शासनाच्या नोव्हेंबर २०१४ च्या परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेत जालना जिल्ह्यातील १२४३ शेतक-यांचे १ कोटी ३७ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले होते. मात्र, कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. शेतक-यांकडून होणारी मागणी पाहता शासनाने कार्यक्षेत्राबाहेरील सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांनाही योजनेचा लाभ देण्याची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील समित्यांनी परवानाधारक सावकारांचे दप्तर तपासण्यात आले होते. मध्यंतरीच्या कालावधीत हजारो शेतक-यांनी सावकारांचे कर्ज फेडले. त्यामुळे सहा परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेले १२६ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असून, संबंधित शेतक-यांकडे असलेले २९ लाख १ हजार ३१८ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर आता शासनाने अर्थसंकल्पातच मराठवाडा, विदर्भासाठी जवळपास ६५ कोटी रूपयांची तरतूद केल्याने सावकारांकडील कर्ज असलेले १२६ शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत.जालना, जाफराबाद तालुक्यातील लाभार्थी आणि रक्कमजालना तालुक्यातील १०९ शेतक-यांचे ७ लाख ७५ हजार ५५० रूपये मुद्दल, ६ लाख २७ हजार ३१० रूपये व्याज. जिल्हा समितीच्या बैठकीपर्यंतचे ११ हजार ६६५ रूपये व्याज असे एकूण १४ लाख १४ हजार ५२५ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.जाफराबाद तालुक्यातील १७ शेतक-यांचे ९ लाख रूपये मुद्दल, ५ लाख ६८ हजार ७४४ रूपये व्याज, जिल्हा समितीच्या बैठकीपर्यंतचे १८ हजार ४९ रूपये व्याज असे एकूण १४ लाख लाख ८६ हजार ७९३ रूपये कर्ज माफ होणार आहे. जालना व जाफराबाद तालुक्यातील सावकारांचे शेतक-यांकडे असलेले एकूण २९ लाख १ हजार ३१८ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजना