शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार! भोकरदन हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:14 IST2026-02-04T19:13:15+5:302026-02-04T19:14:44+5:30

पीडितेने आईजवळ फोडला हंबरडा, नराधमाला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Private School bus driver abused and raped the minor student, Bhokardan was shocked | शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार! भोकरदन हादरले

शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार! भोकरदन हादरले

भोकरदन (जालना): शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच गावातील खाजगी गाडी चालकाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना २ फेब्रुवारी रोजी भोकरदन-नांजा रोडवर घडली आहे. याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी भरत भीमराव मगरे (वय ३२, रा. कोदोली) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नेमका काय घडला प्रकार? तालुक्यातील एका गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी भोकरदनला येतात. बसची सोय नसल्याने गेल्या पाच-सहा वर्षांपासून भरत मगरे हा आपल्या गाडीतून या विद्यार्थ्यांना ने-आण करतो. २ फेब्रुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तो विद्यार्थ्यांना घेऊन निघाला. सर्वांना आपापल्या शाळेत सोडल्यानंतर, १० वीत शिकणाऱ्या या पीडित मुलीला त्याने शाळेत न सोडता नांजा रोडवरील एका शेतात नेले. तिथे ओरडू नये म्हणून तोंड दाबून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पीडितेने आईजवळ फोडला हंबरडा 
या घटनेनंतर घाबरलेली मुलगी घरी परतली आणि तिने आईला सर्व आपबिती सांगितली. आईने तात्काळ भोकरदन पोलीस ठाणे गाठून ३ फेब्रुवारी रोजी उशिरा फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला तत्काळ अटक केली. आरोपी भरत मगरे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत, तरीही त्याने अशा अघोरी कृत्याने माणुसकीला काळिमा फासला आहे.

आरोपीला पोलिस कोठडी
पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपीविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने त्याला ७  फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title : स्कूल ड्राइवर ने नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म; भोकरदन स्तब्ध।

Web Summary : भोकरदन में एक स्कूल कार ड्राइवर ने 16 वर्षीय छात्रा का यौन उत्पीड़न किया। आरोपी भरत मगरे को गिरफ्तार कर लिया गया है। घटना से आक्रोश फैल गया है और स्कूल परिवहन के दौरान छात्रों की सुरक्षा को लेकर चिंताएं बढ़ गई हैं। पुलिस पोक्सो एक्ट के तहत मामले की जांच कर रही है।

Web Title : School driver sexually assaults minor student; Bhokardan shocked.

Web Summary : A school car driver in Bhokardan sexually assaulted a 16-year-old student. Bharat Magare, the accused, has been arrested. The incident has sparked outrage and raised concerns about student safety during school transport. Police are investigating the case under POCSO act.