शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार ५३४ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST

जाफराबाद : थकीत वीजबिलाचे कारण पुढे करत महावितरणकडून तालुक्यातील १६७ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील १ ...

जाफराबाद : थकीत वीजबिलाचे कारण पुढे करत महावितरणकडून तालुक्यातील १६७ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या रोहित्रांवरील १ हजार ५३४ कृषी पंपांची वीज गुल झाली असून, ऐन हातातोंडाशी आलेली पिके आता पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. ‘महावितरण’ने अचानक राबविलेली ही मोहीम मात्र, शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.

महावितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जाफराबाद तालुक्यातील विशेष म्हणजे ज्या भागात बागायत रब्बीचे क्षेत्र जास्त आहे. त्या भागातील १ हजार ५३४ ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या भागात १० कोटी ९६ लक्ष रुपये वीज बिल थकीत असल्याचे सांगितले जात आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली होती. रब्बी हंगामातही रोगराईसह इतर संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी पिके जगविली आहेत. रब्बीतील ऊस, गहू, हरभऱ्यासह इतर पिके सध्या बहारात आहेत. या पिकांमुळे चांगले उत्पन्न हाती मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, महावितरण कंपनीने अचानक थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

हिवाळा संपला असल्याने सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे, गहू, हरभरा, ज्वारी, उसासह इतर पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु, वीजपुरवठा खंडित झाल्याने या पिकांना पाणी देता येत नाही. अगोदरच शेतकरी अस्मानी संकटांनी हैराण झालेले आहेत. त्यात आता महावितरण कंपनीकडून कारवाईचा शॉक दिला जात आहे.

या कारवाईमुळे रब्बी पिके धोक्यात आली असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

चार उपकेंद्रांतर्गत शेतकऱ्यांना फटका

जाफराबाद तालुक्यात १५ हजार ४६ ग्राहकसंख्या असून, वीजबिलाची २११ कोटी रुपये थकीत आहे. मात्र, बिल वसूल करण्यासाठी महावितरण कंपनी यांनी शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता तालुक्यातील हिवराकाबली, टेंभुर्णी, माहोरा, जाफराबाद उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे.

कोट

कृषी पंपांचे थकीत वीज बिल वसूल होणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहेे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेनुसार ५० टक्के वीज बिल भरले तर त्यांचे उर्वरित बिल कृषी धोरणांतर्गत माफ होणार आहे.

व्ही. आर. गांधीले, उपकार्यकारी अभियंता, जाफराबाद