Police raid at country liquor bar | देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा
देशी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथील जवखेडा रस्त्यावर एका ढाब्यावर सुरू असलेल्या विनापरवाना देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी गुरूवारी छापा मारून एका जणास मुद्देमालासह ताब्यात घेतले.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दारूबंदी आदेश लागू आहे. मात्र, काही जण विनापरवाना देशी दारू विक्री करीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांच्या पथकासह हसनाबाद पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. यामध्ये जवखेडा रस्त्यावरील चांधई एक्को जवळ एका ढाब्यावर बेकायदेशिर सर्रास देशी दारू विक्री होत असल्याचे समजले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शखाली पोलीस नाईक जगदीश बावणे, रामेश्वर शिनकर, सागर देवकर, गणेश पायघन, प्रताप चव्हाण, विष्णू बुनगे यांनी सदर ढाब्यावर छापा मारला. यावेळी १८० मिलीच्या तीन हजार ४३० रूपये किंमतीच्या ४९ बॉटल जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सागर देवकर यांच्या फिर्यादिवरून राजूर पोलीस ठाण्यामध्ये राजू संजू जैस्वाल याच्या विरूध्द दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार विष्णू बुनगे करीत आहेत.


Web Title: Police raid at country liquor bar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.