शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस लाईफ; ना ड्युटीची वेळ, ना घराचा मेळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

जालना : रात्र-दिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना ना ड्युटीची वेळ असते, ना त्यांना कुटुंबाला वेळ देता येत. ...

जालना : रात्र-दिवस नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना ना ड्युटीची वेळ असते, ना त्यांना कुटुंबाला वेळ देता येत. सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाची ही कहाणी आहे.

ते जालना शहरातील पोलीस वसाहतीतील १२ बाय १८ च्या दोन खोल्यांमध्ये राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना जेमतेम पगार आहे. त्या पगारावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांना घर बांधता आले नाही. पोलिसांना १२ तासांची ड्युटी असते. परंतु, दैनंदिन गुन्हे, घडलेली घटना, बंदोबस्त यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. कधी-कधी तर यावरून पती - पत्नीत भांडणेदेखील होतात. काही कारणास्त्व आम्ही सदरील पोलिसाचे नाव घेतलेले नाही.

ड्युटी किती तासाची ?

पोलिसांची ड्युटी १२ तासांची असते. परंतु, त्यांच्याकडे आलेले तपास व बंदोबस्तामुळे त्यांना तब्बल १५ ते १७ तास ड्युटी करावे लागते.

मुलांचे शिक्षण कसे ?

संबंधित पोलीस अधिकाऱ्याला दोन मुले आहेत. मुलगा सातवीच्या, तर मुलगी चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी चांगल्या शाळेत पाठविले जात आहे.

कुटुंबासाठी फार कमी वेळ

सतत घडणाऱ्या घटना, गुन्ह्यांचे आलेले तपास व वेगवेगळे बंदोबस्त यामुळे कुटुंबासाठी फार कमी वेळ मिळतो.

पोलीस वसाहतीत राहावे लागते

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी स्वत;चे घर खरेदी केले नाही. ते पोलीस वसाहतीत राहतात.

त्यांची ड्युटी २४ तास सुरू असल्याने घरातील सर्वच कामे पाहावी लागतात. मुलांचे शिक्षण, घरात लागणारे साहित्य ही कामे मलाच करावी लागतात. घर चालविताना मोठी कसरत करावे लागते. मुलांच्या शिक्षणासाठीच आम्ही घर बांधले नाही, असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.