पोलिसांची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 09:59 IST2021-05-27T16:18:21+5:302021-05-28T09:59:43+5:30

Crime News in Jalna या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे,

Police beat BJP Yuva Morcha's activist, video goes viral | पोलिसांची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ठळक मुद्दे ९ एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता.त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता

जालना : एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे.  शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, ९ एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. शिवाय, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.

याप्रकरणात  भाजपच्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून अमानुष मारहाणीबद्दल संताप व्यक्त केला आहे. 'कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत लोकांचे खुन होताहेत तिथे दाखवा खाकीचा ज़ोर...गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय ???' असा सवाल त्यांनी पोलीस प्रशासनास विचारला आहे. यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून, तो माणूस कुणीही असो, त्याने जर चुकीचे केल असेल तर गुन्हा दाखल करा. पण या पद्धतीने गुरांसारखे मारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे म्हटले आहे. 

Web Title: Police beat BJP Yuva Morcha's activist, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.