शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी पाटील तर सचिवपदी पठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी बदनापूर : शहरातील बाजारपेठेसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर ...

मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी

बदनापूर : शहरातील बाजारपेठेसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने, चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे, शिवाय पादचाऱ्यांनाही मोकाट जनावरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

विस्कळीत सेवेमुळे मंठा शहरवासीय त्रस्त

मंठा : शहरासह परिसरातील बीएसएनएलसह खासगी कंपन्यांचीही सेवा विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांना संपर्क साधताना अडचणी येत असून, इंटरनेट सेवेचाही पूर्णत: बोजवारा उडाला आहे. इंटरनेटअभावी बँकिंगसह शासकीय, निमशासकीय कामावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे बीएसएनएलसह खासगी कंपन्यांनी सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.

ग्रामीण रुग्णालयात युनानी दिन साजरा

भोकरदन : शहरातील ग्रामीण रुग्णालयात जामिया मिलिया इस्लामियाचे पहिले कुलगुरू हकमी आजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक युनानी दिन साजरा करण्यात आला. यावेळी युनानी तज्ज्ञ डॉ.शाहीद देशमुख यांनी युनानी औषधी, उपचार पद्धतीबाबत माहिती दिली. कार्यक्रमास अधीक्षक डॉ.दयानंद मोतीपवळे, डॉ.अमोल मुळे, डॉ.हर्षल महाजन, डॉ.दीपक सोनी, डॉ.सय्यद वसीम, त्र्यंबक सुरासे, बबलू पठाण आदींची उपस्थिती होती.

शिक्षक संघाचे प्रश्न सोडविण्याची मागणी

मंठा : महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या मंठा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांची भेट घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न मांडले. शिक्षकांच्या प्रश्नावरील चर्चेनंतर हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सवडे यांनी दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, भगवान जायभाये, सुनील साबळे, कृष्णा सवडे, अहीरराव यांच्यासह शिक्षक संघटने पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती.

खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ

अंबड : शहराला जोडणाऱ्या विविध ग्रामीण रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून, शेतकरी, प्रवाशांना अशा खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे. वाहन चालकांनाही कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. ग्रामीण रस्त्यांची दुरस्ती करण्याची मागणी वेळोवेळी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.